
रोजगार विभागाच्या वेबसाईटवर प्रोफाईलचे अद्ययावतीकरण
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांची नोंदणी करण्यात आली आहे.
नोंदणी करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये व्हेरिफाईड, अनव्हेरिफाईड उमेदवारांचा डाटा अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने सदर उमेदवारांनी संकेतस्थळावरील (रजिस्ट्रेशन नंबर) युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगइन करावा, उमेदवारांनी आपला तपशील अद्ययावत करावा. आपले आधार लिंक अद्ययावत नसेल तर आधार अद्ययावत करावे. नवीन उमेदवारांनी देखील नावनोंदणी केली नसल्यास त्यांनी आपल्या नावाची वरील संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
उमेदवारांना आपला आधार व प्रोफाईल तात्काळ अपडेट करण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करावे. अधिक माहितीसाठी ०२३५२-२२१४७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
www.konkantoday.com