मुंबई गोवा महामार्गाची कचरा कुंडी,वेरळ ग्रामपंचायतीच्या कचरा न फेकण्याच्या सुचनेला हरताळ
खेड : मुंबई गोवा महामार्ग्वरील वेरळ येथे महामार्गाचीच कचरा कुंडी बनवण्यात आल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो त्या ठिकाणी वेरळ ग्रामपंचायतीने इथे कचरा फेकू नये’ असा फलक लावला आहे. मात्र तरीही या ठिकाणी राजरोसपणे कचरा फेकला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या सुचनेला हारताळ फासला गेला आहे.
वेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील गणपती कृपा या हॉटेलच्या बाहेर महामार्गावरच ही कचरा कुंडी तयार करण्यात आली आहे. रस्त्यावरच फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणत दुर्गंधी पसरली असल्याने महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि पादचारी यांना नाक हातात धरून प्रवास करावा लागतो आहे. ज्या ठिकाणी कचरा फेकला जात आहे त्या ठिकाणी वेरळ ग्रामपंचायतीने कचरा न फेकण्याची सुचना करणारा फलक लावला आहे. कचरा फेकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही ग्रामपंचायतीने या फलकाच्या माध्यमातून दिला आहे. मात्र तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या इशाराला कचरा फेकणारे जुमानित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महामार्गावर ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो त्या ठिकाणपासून काही अंतरावर एक खेड तालुक्यातील सर्वात मोठे निवासी संकुल आहे. या संकुलामध्ये अनेक कुटुंब रहात आहेत. यातील काही कुटुंब स्वमालकीच्या तर काही भाड्याच्या घरात रहात आहेत. या कुटुबांमध्ये रोज मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणारी यंत्रणा असणे आवश्यक होते. मात्र या संकुलामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणारी कोणतीच यंत्रणा नसल्याने येथील रहिवाशांनी चक्क महामार्गाचीच कचरा कुंडी बनवली असावी अशी चर्चा परिसरामध्ये आहे. परिसरात सुरु असलेल्या चर्चेनुसार या निवासी संकुलामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी संकुलाची उभारणी करणाऱ्या
विकासकाने आवश्यक ती यंत्रणा उभारली नसेल आणि त्यामुळे येथील रहिवाशी जर कचरा महामार्गावर फेकत असतील तर ते चुकीचे असल्याने ग्रामपंचायतीने केवळ इशान्याच्या फलक न लावता महामार्गावर कचरा फेकणाऱ्यावर आणि त्यांना हा कचरा महामार्गावर फेकण्यास प्रवृत्त करणाऱ्या विकासकावर कारवाई कडक कारवाई करावी अशी मागणी दुर्गंधीने हैराण झालेले वाहन चालक आणि पादचारी करत आहेत.
www.konkantoday.com