नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण
नागपूरमध्ये कोरोनाने उद्रेक मांडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या परिस्थितीशी पालिका प्रशासन लढा देत आहे. परंतु, कोरोनाशी लढा देत असताना पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
तुकाराम मुंढे यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे’ असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं
www.konkantoday.com