
अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्याकडे ३२ कोटींची मालमत्ता
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकिल सावंत यांच्याकडे एकूण ३२ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यानुसार शकिल सावंत यांच्याकडे दुबईमध्ये ऑडी, बीएमडबल्यूसह चार गाड्या असून भारतातही चार गाड्या आहेत. तर २५ लाख रुपययांचे दागिने असल्याची माहिती सावंत यांनी दिली.शकिल सावंत यांचे रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथे सावंत पॅलेस नावाचे हॉटेल असून ए. के. केटरर्सचे गोडावून आहे. दोघांची बाजारमूल्याप्रमाणे किंमत २६ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. तसेच सावंत यांची संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे व रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडम येथे एकूण ५४ लाख रुपयांची जमीन आहे. त्यापैकी १२ लाख रुपयांची जागा ही वडिलोपार्जित आहे. तसेच ७६ लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे. शकिल सावंत यांची एकूण स्थावर मालमत्ता ही ३० कोटी ७७ लाख रुपये इतकी आहे. www.konkantoday.com