
मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
जर मोटार वाहनाशी संबंधित तुमचे कोणतेही कागदपत्र कालबाह्य झाले असतील किंवा होणार असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण या निर्णयामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकणार आहात
www.konkantoday.com