
चंदुलाल शेठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील रितेश संजय जाधवची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील रितेश संजय जाधव याने विभागीय तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याची राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. यापूर्वीही त्यांनी पथकांची लयलूट केली आहे. प्रशाला समिती चेअरमन राजेश बुटाला, संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.www.konkantoday.com




