
एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये जाणार होते – संजय राऊत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती.हे दोघे कॉंग्रेसमध्ये आल्यास या दोघांना मुख्यमंत्री बनवू असं पटोले यांनी म्हटलं आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य केले आहे.
नाना पटोलेंनी शिंदे आणि अजित पवारांना दिलेल्या ऑफरवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ‘नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो. नाना पटोले आमचे सहकारी आहेत जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.’कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरवर बोलताना संजय राऊत यांनी, ‘एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा…अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा दावा केला आहे.




