भाजपा जिल्हा कार्यकारिणीत सोशल इंजिनियरिंग बरोबर २० व्यावसायिकांचा सहभाग
रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीचे गठन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले. नव्याने जिल्हाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर भाजपाच्या घटनेनुसार ७० सदस्य व २० पदाधिकारी यांची कार्यकारिणी ॲड. पटवर्धन कशी तयार करतात ? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते. गटातटाचे राजकारण, नवे-जूने कार्यकर्ते यांना साथीला घेत सर्वसमावेशक कार्यकारिणी गठीत करण्याचे आव्हान ॲड. दीपक पटवर्धन यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीवर सहजपणे पेलले असे घोषित कार्यकारिणी वर नजर टाकता लक्षात येते.
स्वतः पेशाने वकील असलेले आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन जिल्हाध्यक्षांनी चोखंदळपणे जनमानसात स्थान असलेली व्यक्तीमत्व नवीन कार्यकारिणीत समाविष्ट केली आणि भाजपाचा जनमानसातील जनाधार अधोरेखित झाला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक कदम, ॲड. साखळकर, कुणबी समाजाचे उभरते व्यक्तिमत्व ॲड. महेंद्र मांडवकर, डॉ. धुळप, डॉ. बेडेकर, डॉ. चंद्रशेखर केळकर, चार्टर्ड अकौंटंड सौ.मुग्धा करंबेळकर, चार्टर्ड अकौंटंड श्रीरंग वैद्य, अनेक पारितोषिकांनी सन्मानित प्रगत शेतकरी मिलिंद वैद्य, राज्यस्तरावर नाव कमावलेल्या प्रसिद्ध गायिका सौ.मुग्धा भट-सामंत, ॲड. स्मिता कांबळे, ॲड.अमित शिरगावकर, ॲड. एकनाथ मुंडे, ॲड. ऋषिकेश कवितके, ॲड. गुरव, डॉ. श्रीपाद मुळे, ॲड. सुमित्रा भावे, डॉ.निशिगंधा पोंक्षे, सौ. बोपर्डीकर अशी नावे भाजपा जिल्हा कार्यकारिणीत दिसून येतात. रत्नागिरी भाजपचा चेहरा अधिक लोकाभिमुख करण्याचा हा प्रयत्न खूप महत्वपूर्ण ठरेल. वकील, डॉक्टर्स, चार्टर्ड अकौंटंड, प्राध्यापक, शिक्षक असे २० सदस्य कार्यकारणीत समाविष्ट आहेत.
मात्र केवळ शहरी चेहेऱ्यांवर मर्यादित न रहाता ७० जणांच्या कार्यकारिणीत ३५ कार्यकर्ते ग्रामीण भागाशी निगडीत असून शेतकरी वर्ग, मच्छीमार, आंबा व्यावसायिक, कंत्राटदार, व्यापारी या सर्व घटकांना या कार्यकारिणीत सहभाग प्राप्त आहे.२२ महिला, १० आरक्षित घटकांचे प्रतिनिधी, ३ अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी या कार्यकारिणीत समाविष्ट आहेत.
राजेश सावंत, सचिन वहाळकर, यशवंत वाकडे यांची सरचिटणीस म्हणून केलेली निवड, जातीय समिकरण, संघ निष्ठा नवा-जूना समन्वय याचं उत्तम उदाहरण ठरावी अशी आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून परत एकदा ॲड. बाबासाहेब परुळेकर यांना संधी देण्यात आली. प्राध्यापक केतकर सर, कै.आ.कुसुमताई अभ्यंकर यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले विजय पेडणेकर हे निवृत्तीनंतर परत सक्रीय झालेले या कार्यकारिणीचे माध्यमातून दिसून येते. जिल्हाध्यक्षांना पक्ष नेतृत्वाने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे त्याची प्रचीती नावांवर नजर टाकता येते. कार्यकारिणी गठीत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी प्राप्त केला आहे. जिल्हाध्यक्ष होताच झालेली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची यशस्वी जाहीर सभा, कोरोना संकट काळात सर्वदूर केलेले मदत कार्य, सरकार प्रशासन यांच्या विरोधात उपस्थित केलेले मुद्दे, रामजन्मभूमी मंदिर निर्माण शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यात सर्वदूर झालेले कार्यक्रम, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्ष परिपूर्ती निमित्ताचे डिजिटल बेस कार्यक्रम आणि खास पटवर्धन टच असलेले भाजपा कार्यालयाचे नुतनीकरण आणि त्या कार्यक्रमाला आ.चंद्रकांतदादा पाटील यांची ऑनलाईन आणि प्रदेश सरचिटणीस आ.चव्हाण आणि आ.लाड यांची उपस्थिती या सर्वामुळे भाजपा सक्रीय झाला आहे. संघटना जाणवू लागली हा संदेश देण्यात पटवर्धन यशस्वी झालेत आणि नविन चतुरस्त्र कार्यकारिणी घोषित करून नवे अध्यक्ष त्यांची नवी पद्धती, नवे कार्यकर्ते नवी टीम भाजपाची लोकमानसातील प्रतिमा उजळवणार असे चित्र आहे.
www.konkantoday.com