
दापोलीतील महाजन गुरुजीनी कोरोना काळातही मार्ग शोधला, पीपी किट घालून केल्या पूजा
सध्या कोरोना च्या महा मारीत कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव नियमात अडकला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने या वर्षी भाविकांनी स्वतः गणेशाची पूजा करावी किंवा ऑनलाइन पद्धतीने पूजा करावी असे आवाहन केले होते परंतु अनेक अडचणीमुळे सर्व ठिकाणी ते शक्य नाही त्यामुळे नियम तर पाळायचा पण त्यातून मार्ग काढणे आवश्यक होते इच्छा असेल तर मार्ग मिळतो हे दापोलीतील नंदकुमार महाजन गुरुजींनी दाखवून दिले गेली 35 वर्षे ते पौरोहित्या चे काम करीत आहेत गणेशोत्सवाच्या काळात आपल्या यजमानाकडे दरवर्षी पूजा सांगण्यास जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूजा सांगण्यात जायचे कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता दरवर्षी आपल्यातून गणेशाची सेवा होत असल्याने यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे त्यांना वाटत होते शेवटी त्याने दरवर्षीप्रमाणे पूजा सांगण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या मुलांना बाजारपेठेतून पी पी किट आणायला सांगितले त्यांनी पीपी किट अंगावर चढवून सरळ यजमानांची घरे गाठली तेथेही त्यांनी सावधानता बाळगली यजमाना कडून उपस्थित असलेल्यांना त्यांनी मास्क लावण्यास सांगितले दरवर्षीप्रमाणे पूजा पार पाडली गुरुजींच्या यजमान मध्ये दापोलीतील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल मेहता यांचाही समावेश होता त्यांच्या घरीही गुरुजींनी गणेशाची पूजा केली covid-19 सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर मेहता हे स्वतः रुग्णालयात जाताना पीपी किट घालून जातात मात्र त्यांच्या घरी गणपतीची पूजा करण्यासाठी ते सोवळ्यात होते तर पूजा सांगणारे महाजन गुरुजी मात्र पीपी किट घालून होते महाजन गुरुजींनी 11 ठिकाणी पीपी किट घालून पूजा केली गुरुजींनी स्वतः येऊन पूजा घातल्याने भाविकांनाही समाधान लाभले
www.konkantoday.com