
कोकण रेल्वे व्यवस्थापकांकडून सिंधुदुर्गातील प्रवाशांच्या मागण्या मान्य ना. दीपक केसरकर यांचा पुढाकार
सावंतवाडी ः कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या सुपरफास्ट गाड्यांना सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कीमान दोन रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जाईल तसेच जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगलोर सुपरफास्ट व मंगला एक्स्प्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचे कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी तत्वतः मान्य केले. याबाबतचा प्रस्ताव रेल्वेशी व रेल्वे मंत्रालयाशी पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, मुख्य वरिष्ठ व्यवस्थापक एल. के. वर्मा तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारवार पेडणे या मार्गावर धावणारी प्रवासी रेल्वे सावंतवाडी स्थानकावर विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.