कोरोनामुळे गणपतीपुळे देवस्थान ची पाचशे वर्षाची परंपरा खंडित होणार, ऑनलाईन दर्शन ची सुविधा

गणपतीपुळे आणि परिसरातील चार गावांमध्ये “एक गाव एक गणपती’ ही प्रथा गेली पाचशे वर्षे आहे. या साऱ्यांचा एकच गणपती पुळ्याचा. मात्र, यंदा कोरोनामुळे गणेशभक्‍तांना दर्शनासाठी मंदिर खुले करणे अशक्‍य असल्याने ही परंपरा खंडित होणार आहे. तरीही श्री गणरायाच्या चरणाचे तीर्थ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहेत.गणेश चतुर्थीला हजारो भक्‍तगण दरवर्षी दर्शनासाठी गणपतीपुळेत येतात. त्यांच्यासाठीही देवस्थानतर्फे ऑनलाईन लाइव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. www.ganpatipule.co.in ऑनलाईन या लिंकवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. अतिपावसामुळे त्यात खंड पडण्याची शक्‍यता असते; परंतु वरुणराजाने कृपा केल्यास भक्‍तगणांना त्याचा लाभ घेता येईल, असे देवस्थानकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button