कोकणातील 32 वीज कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव
रत्नागिरी – महावितरणच्या कोकण परिमंडल कार्यालयात 74 वा स्वातंत्र दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या हस्ते परिमंडलातील 32 वीज कर्मचाऱ्यांचा ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महावितरणमध्ये दरवर्षी गुणवंत वीज कर्मचाऱ्यांचा गौरव कामगार दिनी करण्यात येतो. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम स्वातंत्र दिनी घेण्यात आला. अनुक्रमे रत्नागिरी जिल्ह्यातील 17 जनमित्रांना व 3 यंत्रचालकांना तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 10 जनमित्रांना व 2 यंत्रचालकांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ म्हणून प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रभारी सहा. महाव्यवस्थापक (मासं) आप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता सर्वश्री रामलिंग बेले, निळकंठ बारशिंगे, नितिन पळसुलेदेसाई, प्रभारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राजेंद्र जाधव यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पुरस्कार अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांचेहस्ते कुडाळ येथेच प्रदान करण्यात आले.
गौरविण्यात आलेल्या जनमित्रांची उपविभागनिहाय नावे पुढीलप्रमाणे
रत्नागिरी जिल्हा : अर्जुन कळंबटे (रत्नागिरी शहर), विलास लिंगायत (रत्नागिरी ग्रामीण), सुरेश भरणकर (लांजा), श्रीपत मांडवकर (राजापूर 1), विशाल पावसकर (राजापूर 2), शिवाजी शितप (देवरुख), कमलू पारधी (संगमेश्र्वर), रमेश सनगरे (जाकादेवी), रमेश गोरिवले (चिपळूण शहर), दिलीप मोहिते (चिपळूण ग्रामीण), गोपाळ गुरव (सावर्डे), सचिन धावडे (गुहागर), शंकर भुवड (खेड), महेंद्र गमरे (लोटे), दिलखुष मोरे (मंडणगड), प्रकाश पालकर (दापोली 1), मोहन जाधव (दापोली 2). तर प्रत्येक विभागातील एक या प्रमाणे श्री, दिपक गोरे (रत्नागिरी), दिलीप काजरोळकर (चिपळूण), दिपक फेपडे (खेड) या 3 यंत्रचालकांचाही गौरव करण्यात आला
.सिंधुदूर्ग जिल्हा
उपविभागनिहाय जनमित्र पुढीलप्रमाणे : भाऊ वारंग (कुडाळ), भरत गावडे (ओरोस), मनोज सावंत (दोडामार्ग), चंद्रकांत सावंत (सावंतवाडी), शंकर सावळ (वेंगुर्ला), हनिफ बोबडे (देवगड), शशिकांत गवंडे (मालवण), श्रीकृष्ण आचरेकर (कणवकवली), दिपक शिरकर (वैभववाडी), महादेव नरे (आचरा). तसेच विभागनिहाय यंत्रचालकांमध्ये श्रीकृष्ण खोत (कुडाळ), दयानंद होडावडेकर (कणकवली) यांचा समावेश आहे
www.konkantoday.com