
मुंबई-गोवा महामार्गावर ओणी पेट्रोलपंपासमोर टेम्पोची दुचाकीला धडक, एक जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर ओणी पेट्रोलपंपासमोर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एकजण जखमी झाला आहे. हरेश भितळे (३६, मंदरूळ, गणेशवाडी) असे जखमी दाकीस्वारो नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता हा अपघात घडला.
या पकरणी वैभव शांताराम मासये यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. हरेश भितळे हे ओणी येथून मुंबई-गोवा महामार्गाने तिवंदामाळ येथे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (एम.एच.०८ बी.जे. १७७५) ही घेवून जात असताना समोरून विरूध्द दिशेने येणाऱया टेम्पोवरील (एम.एच ०४ बी.यु ३२४२) चालकाने ओणी पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या विशिष्ट परस्थितीकडे लक्ष न देता बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून हरेश भितळे यांच्या ताब्यातील वाहनाला धडक दिली.
या अपघातामध्ये हरेश भितळे जखमी झाले असून दुचाकीचेही मोठ्या पमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी टेम्पो मालक हुसेन अब्दुल पाटणकर (वाकेड, खालीवाडी, लांजा) याया विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९१, १२५ व मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.




