रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 73 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ,एकूण पॉझिटिव्ह 3018 ,दोन जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 64 तर आरटीपीसीआर चाचणीत 9 असे एकूण 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3018 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 8, कामथे,चिपळूण १, समाजकल्याण रत्नागिरी ६, घरडा, लवेल, खेड ३ येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1865 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 9
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 28
दापोली – 22
संगमेश्वर – 1
घरडा रुग्णालय – 13
एकूण 9 + 64 = 73 पॉझिटिव्ह रुग्ण
आज पाली, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच काजुरी, ता. गुहागर येथील 42 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 107 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांची संख्या खालीलप्रमाणे
रत्नागिरी – 35
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 20
चिपळूण – 18
संगमेश्वर – 8
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 3018
बरे झालेले – 1865
मृत्यू – 107
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1046 *ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन* जिल्ह्यात सध्या 182 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 31 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 9, चिपळूण तालुक्यात 93 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 11, गुहागर तालुक्यात 9 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 42, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -54, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, कोव्हीड केअर सेंटर घरडा -2, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, उपजिल्हा रुग्णलय दापोली – 1, पाचल -1असे एकूण 141 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

💫होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 43 हजार 303 इतकी आहे.
💫एकही अहवाल प्रलंबित नाही
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 358 नमुने तपासण्यात आले असून सर्व 22 हजार 358 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3018 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 19 हजार 328 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित अहवाल निंरक आहेत
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 16 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 85 हजार 970 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 24 हजार 773 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,
💫नियंत्रण कक्ष दूरध्वनी-०२३५२-२२२२३३ व २२६२४८
आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button