
जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे, पूर्णवेळ फिजिशिअन्स उपलब्ध करणे अत्यावश्यक
रत्नागिरीत आता कोरोना समूह संसर्ग झाल्यासारखी भीती आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे, पूर्णवेळ फिजिशिअन्स उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. हाय नेसल फ्लो मशिन गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असून सुमारे 20 मशीनची खरेदी केली पाहिजे. किमान 2 ते 3 इच्छुक खासगी रुग्णालयांना शासनाने मान्यता द्यावी. मोठ्या प्रमाणात स्क्रिनींग तत्काळ करावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभय धुळप यांनी केली आहे.
www.konkantoday.com