चाकरमानी येऊ शकले नाहीत तरी त्यांच्या घरी गणपती उत्सव साजरा होणार,हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना राबविली
यंदा इच्छा असूनही अनेक चाकरमानी आपल्या गावी येऊ शकले नाहीत कोकणातील प्रत्येक गावात आपल्या घरी गणेश चतुर्थीला घरात गणपती बसवून पूजाअर्चा करण्याची परंपरा आहे. काही चाकरमानी येऊ न शकल्याने ही परंपरा खंडित होणार की काय अशी चिंता निर्माण झाली होती ती कोरोनातील टाळेबंदीमुळे खंडित होऊ नये यासाठी हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना राबविली आहे. मुंबईतून येणे शक्य नसलेल्या चाकरमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याची जबाबदारी वाडी कृतिदलाने स्वीकारली असून त्यावर होणारा खर्च मुंबईतून चाकरमानी पाठवून देणार आहेत. ही संकल्पना आदर्शवत असून मुंबईकर चाकरमान्यांची गावाकडील घरी गणपती आणण्याची इच्छापूर्ती करणेही शक्य होणार आहे.गावातील घरात गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी वाडी कृतिदल घ्यायला तयार आहे, असे आवाहन मुंबईकर चाकरमान्यांना केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही लोकांनी तयारी दर्शवली आहे सरपंच कांचन नागवेकर यांनी याकामी पुढाकार घेतला
www.konkantoday.com