बनावट ई पासचा वापर करणार्‍या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोकणात प्रवेश करण्यासाठी बनावट ई पासचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद वसीम रफिक लालू ,तन्वीर काझी व अजीम मंगा
या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे वरील सर्व लोक आपल्या झायलो गाडीतून कोकणात प्रवेश करीत असताना कशेडी घाट येथे त्यांना तपासणीसाठी थांबविण्यात आले त्यांनी पोलिसांना पास दाखवला पोलिसांनी तो पास स्कॅन केला असता त्या पासवरील कोड स्कॅन झाला नाही तसेच पास वरील इंग्रजी अक्षरे लहानमोठी दिसली त्यामुळे पाेलिसांना संशय आला त्यानी हा पास पोलिस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी पाठवला असता हा पास बनावट असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला असता उद्यमनगर येथील राहणारा अजीम मंगा याने हा बनावट पास तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नावाचा लोगोचा गैरवापर करून बनावट पास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button