भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, ‘भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही’, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. मात्र अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये, अशी आमची अपेक्षा आहे’, असं फडणवीस म्हणाले.
‘सुशांत प्रकरण सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत’, असं फडणवीस यांनी मत मांडलं.
www.konkantoday.com