कोरोना टेस्ट सक्तीमुळे चाकरमानी कोकणात येण्यास अनुत्सुक ,एसटी व खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांकडे फिरवली पाठ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी 12 ऑगस्टनंतर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एसटी आणि खाजगी बसेसकडे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पाठ फिरवली आहे. 12 ऑगस्टपर्यंत ई-पास काढून अनेकजण खाजगी बस, त्यासोबतच एसटी बस सुरु झाल्यानंतर एसटीने प्रवास करत कोकणात पोहचले. मात्र, 13 ऑगस्टपासून कोकणात जायला कोरोना टेस्ट करावी लागत आहे. कोरोना टेस्ट नेगटीव्ह आल्यानंतरच ई-पास प्रवशाला मिळणार असून त्यानंतर त्याला आरक्षण करून कोकणात गणेशोत्सवासाठी जाता येणार आहे. कोरोना टेस्ट बंधनकारक असल्याने त्यासाठी खर्च करावा लागणार असून कुटुंब कोकणात जाताना हा खर्च वाढून त्यात एसटी बस किंवा खाजगी बस तिकिटांचा खर्च यामुळे आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवासी कोकणात जाण्याचे नियोजन रद्द करताना पाहायला मिळत आहेत. 12 ऑगस्टपर्यंत खाजगी बसमध्ये चांगले आरक्षण होत असताना 13 ऑगस्टपासून आरक्षण कोकणासाठी झाले नसल्याने सगळ्या गाड्या एका जागी उभ्या असून या नियमामुळे मोठा फटका बस मालकांनासुद्धा सहन करावा लागत असल्याचे मत, मुंबई
बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button