‘आत्मनिर्भर भारत” हा देशवासियांचा नवा मंत्र :- मोदी

▪️स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊन 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले.

▪️ PM मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

▪️आत्मनिर्भर भारत बनणं गरजेचं आहे.

▪️ देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार

▪️ आजपासून National Digital Health Mission चा आरंभ केला जातोय.

▪️ प्रत्येक भारतीयाला हेल्थ ID दिला जाईल, यात तुमची संपूर्ण आरोग्यविषयक माहितीअसेल.

▪️ काही महिन्यांत N-95 मास्क, PPE किट, वेंटिलेटर विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आज भारतात याचं उत्पादन सुरू करण्यात आलं.

▪️ भारत केवळ स्वत:ची गरज पूर्ण करत नाही तर इतर देशांना मदतीचा हात देत आहे.

▪️ सायबर सुरक्षेसाठी एक रणनिती आखण्यात येणार आहे.

▪️Vocal For Local ही स्वतंत्र भारताची मानसिकता असायला हवी

▪️ भारताने परकीय गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडले

▪️देशाच्या विकासात शिक्षणाचं खूप महत्व आहे. त्यामुळेच तीन दशकांनंतर आम्ही देशाला एक नवं शिक्षण धोरण दिलं आहे.

▪️ अंदमान निकोबारला ऑप्टिकल फायबरने जोडलं जात आहे. चेन्नईत जसं वेगवान इंटरनेट आहे तसंच या बेटांवरही असेल

▪️ जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे

▪️ देशाच्या संपूर्ण पायाभूत विकासाला नवी दिशा देण्याची गरज आहे

▪️ देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास

▪️ कोरोनाच्या संकटातही कोट्यावधी गरिबांना मोफत गॅस मिळाला. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पोहचवण्यात आलं.

▪️ ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे

▪️ आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास गरजेचा आहे. यासाठी आम्ही मागास असलेल्या 110 जिल्हे निवडले आहेत

▪️ जलजीवन मिशनला आज एक वर्षं झालंय. दररोज आम्ही 1 लाखापेक्षा जास्त घरांत पाईपने पाणी पोचवत आहोत

▪️आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक 24 तास काम करत आहेत.

▪️ कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे.

▪️ पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाच्या वीर जवानांना सलाम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button