दंतवैद्यकीय आणि पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
दंतवैद्यकीय आणि पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पषट शब्दात नकार दिला आहे. ‘तुम्ही डॉक्टर आहात, आज जर तुम्हीच परीक्षा द्यायला बाहेर पडायला घाबरलात तर उद्या रुग्णांवर उपचार कसे करणार आहात?’, या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कोणत्याही परीक्षांना स्थगिती दिलेली नाही, तेव्हा जे विद्यार्ती परीक्षा देऊ इच्छित असतील अशांवर अन्याय करता येणार नाही.
www.konkantoday.com