जिल्हा परिषद भवनातील ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ
जिल्हा परिषद भवनातील कामकाजावर सध्या कोरोनाचे सावट गडद होत आहे. भवनातील ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. यात एका अधिकार्याचाही समावेश आहे. यामुळे भवन सध्या ‘डेंजरझोन’मध्ये सापडले आहे. प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी कर्मचारी संघटना पदाधिकार्यांनी जि. प. अध्यक्ष रोहन बने व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
www.konkantoday.com