चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसला कशेडी घाटात लुटण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सतर्कतेमुळे फसला,एक आरोपी अटकेत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसला कशेडी घाटात लुटण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. ही घटना गुरुवारी (दि. १३) पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कशेडी घाटातील धामणगाव जवळ घडली. ही बस मुंबईहून गुहागरकडे येत होती. काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे यावेळी दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास गुहागरकडे येणाऱ्या एका खासगी बसचा वेग घाटात धामणगावजवळ कमी झाल्यानंतर चालत्या गाडीत चढून बस लुटण्याचा प्रयत्न झाला.मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. याबाबत पोलादपूर पोलिस स्थानकात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणी एकास अटक करण्यात यश आले आहेया टोळीतीळ ६ फासेपारधीपैकी आरोपी अशोक जाधव (रा. उस्मानाबाद) याला घटनास्थळी दरोडा प्रकरणी पकडण्यात आले आहे. तर अन्य ५ जण फरार आहेत.
www.konkantoday.com