लांजा शिपोशी येथे शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग,गुन्हा दाखल

शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला वाटेत अडवून तिच्या दंडाला धरुन ओढत नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शिपोशी येथील तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर अल्पवयीन मुलगी इयत्ता नववी मध्ये शिपोशी हायस्कूलमध्ये शिकत आहे. ही मुलगी बुधवारी १७मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्याने शाळेतून पायवाटेने घरी परतत असताना अरुण दत्ताराम सुतार (वय ३५, शिपोशी सुतार वाडी) या तरूणाने तिचा विनयभंग केला.याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button