कोरोना रुग्णांसाठी चिपळूणमधील खाजगी रुग्णालये ताब्यात घ्या, पंचायत समितीचा ठराव
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. त्यामुळे येथील रुग्ण कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे हलवावे लागत आहेत. त्यामुळे चिपळुणात खासगी दवाखाने शासनाने ताब्यात घेऊन कोव्हिड रुग्णालय करावे, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांनी आपली आग्रहाची भूमिका मांडली.
येथील पं. स.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सकाळी सभापती धनश्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसभापती पांडुरंग माळी, सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव व सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com