संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथे अज्ञाताने घरफोडी करून सुमारे ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

संगमेश्वर तालुक्यातील ओसंगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द गणेशवाडी येथे अज्ञाताने घरफोडी करून सुमारे ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.झरे खुर्द गणेशवाडी येथे अज्ञाताने घरफोडी करून सुमारे ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ एप्रिल ते ८ मे दरम्यान घडली. याबाबत विजय मनोहर जागुष्टे (६१, व्यवसाय-एस.व्ही. ज्वेलर्स) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जागुष्टे हे घरात नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या पुढील दरवाज्याजवळ असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डवर ठेवलेली चावी वापरून किंवा डुप्लिकेट चावीने कुलूप उघडले. घरात प्रवेश करून चोरट्याने चांदीचे ताम्हण (२५० ग्रॅम), चांदीचा तांब्या (३५० ग्रॅम), चांदीची पंचपळी (१५० ग्रॅम), चांदीची छत्री (१५० ग्रॅम), चांदीचा हार (५० ग्रॅम), चांदीचा मोदक (३० ग्रॅम), चांदीचे जास्वंद फूल (१० ग्रॅम), चांदीची पंचाआरती (५० ग्रॅम), दोन चांदीची निरंजन (प्रत्येकी २० ग्रॅम), चांदीची गणेश मूर्ती (५० ग्रॅम), चांदीची बाळकृष्ण मूर्ती (३० ग्रॅम), चांदीचे फुलपात्र (५० ग्रॅम), सोन्याचे जानवे (१० ग्रॅम), एच.पी. कंपनीचा १४ किलोचा लाल टाकी असलेला अर्धवट भरलेला गॅस सिलेंडर आणि निळ्या रंगाचा ५ किलोचा रिकामा गॅस सिलेंडर असा एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button