
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा ते वाकेड दरम्यानच्या मोर्यांवर खड्ड्याचे साम्राज्य, वाहन चालकांत नाराजी
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा ते वाकेड चौपदरीकरणादरम्यान सतरा मोर्या बांधण्यात आल्या आहेत. दोन वर्षापूर्वी या मोर्यांवरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात आले होते. परंतु आता मात्र या मोर्यांवर शेकडो खड्डे तयार झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने प्रसंगी अपघात होण्याची शक्यता बळावत आहे.
www.konkantoday.com