महिला रुग्णालय इमारतीत आज पासून कोव्हीड रुग्णालय, आज होणार ई -लोकार्पण

0
45
  • येणाऱ्या काळात गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत आहेत . यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधलेल्या महिला रुग्णालयात (उद्यमनगर) 75 बेडची व्यवस्था असणारे कोव्हीड रुग्णालयात तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी श्री लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री श्री अनिल परब तसेच खा. विनायक राऊत यांची यावेळी ऑनलाईन उपस्थिती असणार आहे.
    या ठिकाणी 20 बेडची आयसीयू देखील असेल व 66 रुग्णांसाठी बेडनिहाय ऑक्सीजन लाईन देखील राहणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी कळविले आहे.
    याचे लोकार्पण आज रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे.
    www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here