नाणार रिफायनरी समर्थकांनी आ. राजन साळवी यांची घेतली भेट
तालुक्यातील प्रस्तावित साडेतीन लाख कोटी रुपयांच्या ग्रीन रिफायनरीला तालुक्यातील हजारोंचे समर्थन मिळत असतानाच राजापुरात आलेल्या आ. राजन साळवी यांना सेनेतील प्रकल्प भागातील समर्थकांनी एक निवेदन सादर करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्याची विनंती केली. यावेळी स्थानिक शेतकर्यांच्या साडेआठ हजार एकरची संमत्तीपत्रे देखील सादर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसमवेत खा. विनायक राऊत, पालकमंत्री ऍड. अनिल परब यांना देखील अग्रेषित केलेली निवेदन यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन समर्थक मंडळींना आ. साळवी यांनी दिले.
www.konkantoday.com