
किनारपट्टीवरील जिल्ह्यंत बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी व अतिमुसळधार पाऊस
किनारपट्टीवरील जिल्ह्यंत बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती (सायक्लोनिक सक्र्युलेशन) दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
www.konkantoday.com