रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 20 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 2012,ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 589
रत्नागिरी दि. 05(जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2012 झाली आहे. दरम्यान 22 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1357 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये माटे हॉल, चिपळूण 1, समाजकल्याण मधील 6, घरडा 12 आणि कामथे, चिपळूण येथील 3 रुग्ण आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 17
ॲन्टीजेन टेस्ट – 3
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2012
बरे झालेले – 1357
मृत्यू – 66
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 589
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 238 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 51 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये, खेड मध्ये 64 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 8, चिपळूण तालुक्यात 97 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 , गुहागर तालुक्यात 4 आणि राजापूर तालुक्यात 3, संगमेश्वर तालुक्यात 1 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.