डॉक्टर्स असोसिएशनने दिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घ्या – अॅड.दीपक पटवर्धन.

0
117

रत्नागिरीतील परिस्थिती गंभीर आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यात अनेक डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचारी हे कोरोनाग्रस्त होत आहेत. प्रायव्हेट डॉक्टर्स आपल्या सेवा जिल्हा रुग्णालयात देत आहेत. तरीही रोज वाढणारी रुग्ण संख्या पाहता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीच्या डॉक्टर्स संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बाहेरून नागरिकांना रत्नागिरीत पास देवून आणू नये आणि अतिरिक्त ताण निर्माण करू नये असे पत्र दिले आहे. या पत्राचा गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय करावेत. एकतर मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात मगच ई-पास देऊन लोकांना येण्याची मुभा द्यावी. अन्यथा अपुरी आरोग्य व्यवस्था असल्याने ई-पास बाबत ठोस निर्णय करावा. जनतेच्या जीवाशी खेळण्याचा डाव राजकीय स्वार्थी भावनेतून करण्यात येऊ नये. आरोग्य सुविधा, प्रशासकीय व्यवस्था यांची सर्वस्वी जबाबदारी राज्यशासनाची, पालकमंत्री महोदयांची आहे. याची जाण शासनाने ठेवावी असे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना दिले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here