चोवीस तास उलटूनही चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत
चोवीस तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत। काल सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती मग पाणी जैसे थे होते ते रात्री ओहोटीच्या वेळेस रात्री 1 वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले परंतु आत्ता पुन्हा पहाटे 6 वाजता अचानक पुन्हा पाण्याचा वेग वाढला असून कालच्या पाण्याच्या पातळी पेक्षा आत्ताची पाण्याची पातळी अधिक असून पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे
त्यात परवा रात्री पासून विद्युत प्रवाह खंडित झालेने अनेक नागरिकांच्या मोबाईल चारजींग संपले असल्याने एकमेकांचा संपर्क तुटलाय। त्यात विद्युत प्रवाह तुटल्याने नळपाणी योजनेचे पिण्याचे पाणी सोडता आले नाही त्यामुळे ग्रामस्थांची अधिक गैरसोय पण होते आहे।
Mecb ने भोके मार्गे विद्युत प्रवाह तात्काळ सुरू करावा । ग्रामस्थांच्या रोषाला कारणीभूत तुम्ही होऊ नका असा इशारा माजी सरपंच दादा दळी यांनी दिला आहे।
भरतीची वेळ नसताना बाजारपेठेत पाणी वाढतंय ही नक्की काळजी करण्याची बाब आहे भरतीची वेळ दुपारी 2 च्या दरम्यान असल्याने प्रशासनाच्या धोके आपत्ती विभागाने सतर्क राहावे अशी सूचना करण्यात आली आहे
www.konkantoday.com