सर्वांचे आकर्षण असलेली कर्ला-आंबेशेत येथील गणपती मिरवणूक यावेळी रद्द

दरवर्षी विविध उपक्रमांमुळे लक्ष वेधणारी व शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून अनेक पारितोषिक मिळविलेली कर्ला-आंबेशेत गावातील गणपती यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिरवणुकीने न आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी या देखण्या मिरवणुकीची ३३ वर्षाची परंपरा खंडीत होणार आहे. यावेळी साधेपणाने गणपतीचे आगमन होणार आहे.
कर्ला-आंबेशेत गावाचे सर्व घरातील गणपती एकत्र मिरवणुकीने नेण्यात येतात. गेली ३३ वर्षे ही परंपरा चालू आहे. यामध्ये ढोल पथक, लेझीम पथक, जाखडीपासून केरळच्या वाद्यांचाही यात समावेश असतो. सकाळी निघणारी ही मिरवणूक पाच ते सहा तास सुरू असते. सर्व शिस्तीचे पालन करून निघणार्‍या या मिरवणुकीचे सर्वत्र स्वागत होते. गावातील मुस्लिम बांधवांकडूनही मिरवणुकीचे स्वागत केल्याने ही मिरवणूक हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही प्रतिक आहे. परंतु यावेळी कोरोनाचा जिल्ह्यात असलेला वाढता प्रादुर्भाव असल्याने सामाजिक भान राखून गणपती मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button