
स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माझं बळ हे लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आमचं सरकार समन्वयाने सुरु आहे. आरोप सगळ्यांवर केले जातात. बोलणारे खूप लोक आहेत मी कुणाचाही पर्वा करत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्या नात्याची कुणीही चिंता करु नये.भाजपासोबत आमचा घटस्फोट झाला. त्याची कारणं सगळ्यांना ठाऊक आहेतच. भाजपासोबत आम्ही तीस वर्षे होतो. पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात आम्ही लढलो त्यांनी मात्र माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर सुरु आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. माझ्यावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. त्यांचा विश्वास हेच माझं बळ आहे. त्यांच्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे. माझ्या स्वार्थासाठी मी खुर्चीवर बसलेलो नाही असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं आहे.
www.konkantoday.com