आता दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी लोकशाही दिन

0
28

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दि. ३ ऑगस्टला दुपारी १ ते २ या वेळेत दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
सदर लोकशाही दिनाकरिता नागरिकांना संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये उपस्थित राहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (दूरचित्रवाणी) लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील १०७७ व ०२३५२ -२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधून नागरिकांना आपल्या समस्या मांडता येतील. त्यासह [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करता येतील.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here