मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या ५७ टक्के आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या १८ टक्के लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडीज
मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या ५७ टक्के आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या १८ टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधात अॅंटीबॉडी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे.मुंबई महापालिका, निती आयोग आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
मुंबईतील तीन वॉर्डमध्ये सिरो (SERO) सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आर-उत्तर, एम-पश्चिम आणि एफ-उत्तर या वॉर्डमध्ये लोकांची एँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती.
www.konkantoday.com