
महावितरणने अथक परिश्रमानंतर ५० दिवसांत सर्व गावे प्रकाशमय केली
महावितरण कंपनीने निसर्ग वादळात खंडित झालेल्या गावांना प्रकाशात आणले आहे तेही कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात! निसर्ग चक्रीवादळात महावितरण कंपनीची यंत्रणा भुईसपाट झाली. ४७ उपकेंद्रे बंद पडली, ५ हजार ७०८ रोहित्र जमिनदोस्त झाली, जिल्ह्यातील ६२८ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. गुहागर, मंडणगड व दापोली या तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. मात्र, अथक परिश्रमानंतर ५० दिवसांत सर्व गावे प्रकाशमय केली.
www.konkantoday.com