दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड

0
46

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘चैतन्य’दायी ठरला आहे. आशय आणि विषय या दोन्हीबाबती सरस असलेल्या मराठी चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला असून, महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. १९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे.चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रवी जाधव यांनी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here