रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 31 नवे रुग्ण, एका रुग्णांचा मृत्यु
रत्नागिरी दि. 29 (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1692 झाली आहे. दरम्यान 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1133 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 11, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 6, कोव्हीड केअर सेंटर देवधे, लांजा 6 आणि ॲन्टीजेन टेस्ट – १ रुग्ण मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 18 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ४ रुग्ण
दापोली – ८ रुग्ण
ॲन्टीजेन टेस्ट – १ रुग्ण
उक्ताड, चिपळूण येथील एका 83 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 58 झाली आहे. तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
रत्नागिरी – 13
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 11
चिपळूण – 12
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 4
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1692
बरे झालेले – 1133
मृत्यू – 58
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 501
सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा संख्या 501 झाली आहे. आज विश्वनगर, रत्नागिरी, पठाणवाडी किल्ला, रत्नागिरी, भागीर्थी अपार्टमेंट, पऱ्याची आळी, रत्नागिरी, राज मेडीकल मागे,मारुती मंदीर, रत्नागिरी, गोल्डन पार्क, माळनाका, रत्नागिरी, रेल्वेस्टेशन, रत्नागिरी, महालक्ष्मी मंदीर समोर, कारवांचीवाडी, रत्नागिरी, कापडी रेसिडेन्सी, खेडशी, रत्नागिरी, गणेशनगर, गोळप सडा, रत्नागिरी, खेडशी पुल, रत्नागिरी, महालक्ष्मी मंदिर मागे, खेडशी, रत्नागिरी,सडये पिरंदवणे, रत्नागिरी, मौजे टिके, रत्नागिरी, मिरकरवाडा, रत्नागिरी, गोळप सडा, रत्नागिरी, मौजे उसगाव, ता. संगमेश्वर हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (२८ जुलै २०२० पर्यंत )
जिल्ह्यात सध्या 211 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 25 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 59 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 96 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 , गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
www.konkantoday.com