
अबब! मोदींचे परदेश दौरे आणि जाहिरातबाजीवर तब्बल 66 अब्ज रुपयांचा चुराडा!!
गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अब्ज खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचा परदेश दौरा आणि सरकारी जाहिरातींवर तब्बल 6 हजार 622 कोटी खर्च झाले. यात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 2 हजार कोटींहून अधिक खर्च झाले, तर सरकारी धोरणांशी निगडित जाहिरातींवर तब्बल 4 हजार 607 कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनीच राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.*एकूण परदेश दौरे – 84खर्च – 2 हजार कोटीसर्वाधिक 5 वेळा अमेरिका दौरासरकारी जाहिरातींवर 4 हजार 607 कोटीचा खर्च