
मुकुल माधव विद्यालयाचे मार्च 2020 शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील मध्ये घवघवीत यश
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मुकुल माधव विद्यालयाची पहिली तुकडी इयत्ता दहावीच्या मार्च 2020 मध्ये प्रविष्ट झाली होती. मुकुल माधव विद्यालयातून एकूण 26 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. यामध्ये अबीदा टेमरीकर (92%) गुण मिळाले आहेत त्यानंतर नौफील नाखवा 91%, सोहम महाडिक 91 % , किरण बोरकर 90% याप्रमाणे गुण मिळाले आहेत. एकूण 26 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांनी 75 % च्यावर गुण प्राप्त करून विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. तर उर्वरित सात विद्यार्थ्यांना 64% ते 73% यादरम्यान गुळ प्राप्त झाले आहेत. मुकुल माधव विद्यालयाची ही पहिली तुकडी असल्याने या मुलांना मार्च 2019 पासून विशेष मार्गदर्शन करण्यात येत होते. अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुकुल माधव विद्यालय तर्फे विशेष लक्ष देण्यात आले होते.
शिक्षणाचा हा वसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी देण्यात येणार्या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव विद्यालय तर्फे शैक्षणिक वर्ष 20-21 पासून ज्युनिअर कॉलेजची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. सायन्स आणि कॉमर्स या दोन शाखांसह जुनिअर कॉलेज ची सुरुवात या वर्षापासून करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज नाही तर मुकुल माधव विद्यालयाच्या जूनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात येणार आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुकुल माधव विद्यालयाच्या शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. मुकुल माधव फौंडेशनच्या व्यवस्थापक विश्वस्त सौ.रितू प्रकाश छाब्रिया यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षक वर्ग व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.
www.konkantoday.com




