सिमकार्ड चालू करण्याचे कारण दाखवून अंजनवेल येथील एकाची चार लाख चौतीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
बंद पडलेले सिमकार्ड चालू करण्यासाठी बँकांच्या अकाउंटचे डिटेल माहिती घेऊन अंजनवेल गुहागर येथील आरजी पीएल कंपनीच्या नीरा भुपेंद्र कुमार अग्रवाल यांची ४लाख ३४हजार रुपयांची अज्ञात इसमाने ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार घडला.
फिर्यादी अग्रवाल यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने फोन करून तुमचे एअरटेल मोबाइलचे सिमकार्ड बंद करणार असल्याचे सांगून सिमकार्ड चालू करण्यासाठी फिर्यादीच्या ई मेल व मोबाइलची डिटेल वा इतर माहिती घेतली त्यानंतर त्याचा वापर करून फिर्यादीचे ऑनलाइन नेट बँकिंग चालू करून वेगवेगळ्या कारणासाठी फिर्यादीच्या आयसीआयसी बँक अकाऊंटमधून ४४,४७०,डेबिट पेससाठी २०,०९७,मोबी क्विक साठी ६५हजार ९२४,युटिलिटी सीसीसाठी १लाख ९३,९७३,सीसी एव्हिन्यू साठी ९५हजार ,आयएमपीएस साठी १०हजार व यूपीआयसाठी ५०००असे सर्व मिळून ४लाख ३४हजार ४६५रुपये फिर्यादीच्या खात्यामधुन ट्रान्स्फर करून आपल्या खात्यात घेतले व फिर्यादीची फसवणूक केली या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com