
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतसेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांना पीपीई किटचे बिल आकारता येणार नाही
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासन रुग्णालयांना पीपीई किट देत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांना पीपीई किटचे बिल आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
श्री. टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यात विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ८० टक्के राखीव खाटा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या ठिकाणी उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलात पीपीई किटची रक्कम आकारल्याचे प्रकार पुढे आले आहेत. शासनच पीपीई किट उपलब्ध करून देत असल्याने यापुढे या योजनेअंतर्गत त्याचे बिल रुग्णालयांना आकारता येणार नाही.
www.konkantoday.com