
रत्नागिरी येथील हॉटेलमध्ये कर्मचार्याचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः प्रभा हॉटेलमधील कर्मचार्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9.15 वा.सुमारास उघडकीस आली. प्रकाश महादेव सारंग (वय 50, मूळ रा. कारवार, कर्नाटक, सध्या राहणार प्रभा हॉटेल बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत सागर लक्ष्मण पेडणेकर (वय 32, मूळ राहणार कारवार, कर्नाटक),(सध्या राहणार प्रभा हॉटेल बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही हॉटेलमध्ये कामाला होते. मंगळवारी सागरच्या शेजारी झोपलेले प्रकाश सारंग उठत नव्हते. म्हणून सागरने त्यांच्या तोंडावर पाणी मारले. तरीसुध्दा ते उठत नसल्याने सागरने याबाबत प्रकाश यांचा सख्खा भाऊ दीपक सारंग आणि हॉटेल मालक प्रभात सुर्वे यांना फोन करून याची माहिती दिली. प्रभात सुर्वे यांनी तातडीने प्रकाश सारंगला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून प्रकाशला मृत घोषित केले. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.