मनसे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्यांसाठी खासगी गाड्या सोडणार
राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस सोडण्याचे आश्वासन दिले असले, तरी क्वारंटाईन कालावधी अद्याप निश्चित केलेला नाही. त्यामुळे मनसेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्यांसाठी दि. ४ ऑगस्टपासून खासगी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात जायचे आहे. कोकणातही कोरोनाचे रुग्ण असले, तरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.कोकणात एस.टी.च्या बसेस कधीपासून सोडणार, याबाबत अनिश्चितता आहे. सरकारने जर उशिरा निर्णय घेतला, तर मुंबईतून जाणार्यांची अडचण होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी मनसेने दि. ४ ऑगस्टपासून कोकणात खासगी गाड्या सोडण्याचे ठरविले आहे. त्यासाठी दि. १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू केले जाणार आहे.
www.konkantoday.com