पालीचा सुपुत्र नयन मोरे याची थ्रोबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील राहणारा नयन मोहन मोरे यांची अमेरिकेमध्ये होणाऱ्या थ्रोबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.नुकत्याच मलेशिया येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले होते.या संघात पालीच्या नयन मोरे याचा समावेश होता त्याची चमकदार कामगिरी पाहून आता अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. नयन हा पाली देवतळे येथील राहणारा असून तो थ्रोबॉल स्पर्धेत गेली काही वर्षे चांगली कामगिरी करीत आहे.त्याला या क्षेत्रातील मार्गदर्शक कोल्हापूर येथील आर सी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले त्यानंतर त्याने गोवा संघाकडून खेळताना चंदीगड हरियाना येथे चमकदार कामगिरी केली.त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली होती. नयन यांची आर्थिक स्थिती बेताची आहे.त्याला आर्थिक मदतीची गरज असताना काही बड्या लोकांनी त्यांला केवळ आश्वासने दिली त्यामुळे त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याच्यासाठ पैसे जमविले त्यामुळे नयन याला आपले स्वप्न साकार करता आले. नयन यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button