अंगणवाडी पोषण आहार योजनेखाली निकृष्ट धान्य पुरवठा करणार्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा, जि. प. सदस्यांची मागणी
खडपोली (चिपळूण) एमआयडीसीतील महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशनच्या गोदामातून अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळांना पुरविण्यात येणार्या निकृष्ट धान्याचा मोठा साठा सापडला होता. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने, संतोष थेराडे, बाळाशेठ जाधव आदींनी केली आहे.
www.konkantoday.com