रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील बालरोगतज्ञांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात सेवानिवृत्तीनंतरही काम करणारे बालरोगतज्ञांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्तीनंतरही हे तज्ञ गेली सात वर्षे शासकीय रूग्णालयात काम करीत होते. कोरोनाच्या काळातही कोरोनाबाधित बालकांवर उपचार केले होते. मात्र आज त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
www.konkantoday.com