दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर चालू न झाल्यास राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
दापोली :- (वार्ताहर)दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना सेंटर त्वरित सुरू करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
दापोली-मंडणगड-खेड मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असुन सध्या दापोली मध्ये १०८ रूग्णवाहीकेची कमतरता आहे. रुग्णांना जिल्हा केवीड सेंटर मध्ये दाखल करण्यास खुप विलंब होत आहे. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात २० कॉटचे आय.सी.यु.उपलब्ध आहे. तालुक्यातील अत्यायवस्थ रूग्णांना रत्नागिरी येथे न हलवता जवळच दापोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ कोविड १९ रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे दापोली तालुक्यातील वाढलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. त्वरीत दापोली येथे कोवीड १९ सेंटर चालु करण्यास शासकीय स्तरावर तात्काळ परवानगी द्यावी. अन्यथा नाईलाजास्तव लोकप्रतिनिधीनां आंदोलनाचा पवित्रा अवलंबावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
या वेळी माजी आमदार संजय राव कदम यांच्या समवेत माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री.राजेश गुजर, उप सभापती सौ.ममता शिंदे, पंचायत समिती सदस्य श्री.दिपक खळे, पंचायत समिती सदस्य श्री.चंद्रकांत बैकर, जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहन मुळे, जिल्हा परिषद सदस्या सौ.नेहा जाधव, गटविकास अधिकारी श्री.राऊत साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री.रविंद्र कालेकर, युवक जिल्हाध्यक्ष श्री.चेतन दळवी, श्री.केदार पतंगे, दापोली तालुका युवक अध्यक्ष श्री.विजय मुंगशे, श्री.धिरज पटेल, श्री.युवराज जाधव, श्री.पप्या जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com